Media
मार्च २१, म्हणजेच जागतिक वन्यदिनच्या निमित्ताने पंडित जावडेकर लाईफ स्टोरीज् पॉडकास्ट मध्ये आम्ही घेऊन येत आहोत नामवंत पक्षीतज्ञ व अभ्यासक श्री. किरण पुरंदरे, उर्फ ‘किका’ (किरण काका) ह्यांचा निसर्ग संवर्धनाच्या कार्याचा विलक्षण प्रवास.
ह्या अद्वितीय व्यक्तिमत्वाने बालपणीच्या निसर्गप्रेमाचं रूपांतर अलौकिक साहित्यात केले. ‘आभाळवाटांचे प्रवासी’, ‘चला पक्षी पहायला’, ‘पक्षी-आपले सख्खे शेजारी’, ‘पक्षी पाणथळीतले’, ‘मुठेवरचा धोबी’ सारख्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी आपलं निसर्गप्रेम व्यक्त केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट लेखणीची प्रशंसा प्रसिद्ध मराठी लेखक व्यंकटेश माडगुळकर यांनी देखील केली. श्री.पुरंदरेंच्या प्रकाशित झालेल्या २८ पुस्तकांपैकी ‘सखा नागझिरा’ हे पुस्तक त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला. माडगुळकरांच्या ‘नागझिरा’ ह्या पुस्तकातून प्रेरणा घेत त्यांनी स्वतःचा नागझिरा जंगलातील ४०० दिवसांचा अनुभव मांडला. ह्या पुस्तकाला उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्हाला श्री. पुरंदरेंचे जंगलातील चित्तथरारक किस्से ऐकण्याबरोबरच नागझिऱ्यातील नयनरम्य स्थळं पहायला मिळतील. इतकंच नव्हे तर पक्षी-प्राणी संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना व त्यासाठी सामान्य नागरिक स्थानिक लोकांच्या मदतीने काय करू शकतात हेदेखील ऐकायला मिळेल.
तर अशा ‘अवलिया’ पक्षीप्रेमीच्या अभूतपूर्ण प्रवासाची अनुभूती घ्यायला विसरू नका.